'ईएसडीएस’ उभारणार बाराशे कोटींचे भांडवल

'ईएसडीएस’ उभारणार बाराशे कोटींचे भांडवल

सातपूर | प्रतिनिधी Satpur

क्लाउड सर्व्हिसेस (Cloud Services) आणि डेटा सेंटर (Data Center) क्षेत्रातील कंपनी ’ईएसडीएस’ (ESDS) सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीने (Software Solution Company) आयपीओसाठी सेबीकडे ’ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (Draft Red Herring Prospectus) (डीएचआरपी) दाखल केले आहे.या माध्यमातून कंपनी आयपीओद्वारे 1,200 कोटी उभारणार आहे...

विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेलद्वारे (Offer For Sale) त्यांच्या भागांतून 2 कोटी 15 लाख 25 हजार शेअर्स (Shares) अपलोड करतील. ऑफर फॉर सेलमध्ये भाग घेणार्‍यांमध्ये जीईएफ ईएसडीएसचे भागीदार एलएलसी (42 लाख 31 हजार समभाग), साउथ आशिया ग्रोथ फंड (South Asia Growth Fund) 2 (1 कोटी 68 लाख 60 हजार समभाग), साउथ एशिया ईबीटी ट्रस्ट (South Asia EBT Trust) (34 हजार समभाग) आणि सरला प्रकाशचंद्र सोमाणी (4 लाख समभाग) यांचा समावेश असेल.

हा आयपीओ (IPO) नवीन भागधारक आणि विद्यमान भागधारक दोन्हींसाठी असेल. डीएचआरपीनुसार कंपनी 322 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन समभाग सादर करेल. कंपनी सध्याच्या भागधारकांसाठी आयपीओपूर्वी प्लेसमेंट किंवा 60 कोटी रुपयांपर्यंतच्या प्राधान्य वाटपासाठी राइट्स इश्यूचा विचार करीत आहे. हे नवीन इश्यूमधून कमी केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com