पूरग्रस्तांना एकाच निकषावर समान मदत- पालकमंत्री भुजबळ

लासलगावला अतिवृष्टी भागाची पाहणी
पूरग्रस्तांना एकाच निकषावर समान मदत- पालकमंत्री भुजबळ

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

राज्यात सर्वत्र अतिवृष्टी Heavy Rain in Maharashtra State होत असून मोठ्या प्रमाणावरचे क्षेत्र पूरग्रस्त झाले आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे Punchnama of flood victims करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ Gauardian Minister Bhujbal यांनी दिली.

लासलगाव परिसरातील व्यापारीशेड, लासलगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान तसेच भरवस फाटा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, लासलगाव बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, संदिप दरेकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, हरिश्चंद्र भवंर, गुणवंत होळकर, पांडुरंग राऊत, विकास चांदर, मधुकर गावडे आदी उपस्थित होते.

कांदा व्यापारी शेडला भेट दिली असून तेथे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. एकट्या निफाड तालुक्यात 110 मिलीमिटर इतका पाऊस झाला असून 47 गावे अतिवृष्टिने प्रभावित झाली आहेत.

यासंदर्भात सर्वांना एकसमान निकषावर आधारित मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून शक्य तितक्या लवकर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तात्काळ पंचानामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.