पर्यावरण रक्षण आवश्यक : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक

पर्यावरण रक्षण आवश्यक : पालकमंत्री छगन भुजबळ

क्रेडाईची 'कल्पवृक्ष' मोहीम

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जग वाचविण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल. वृक्ष लागवड मोहीम त्यातील एक महत्वाचे पाऊलच नाही तर ती आजची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रेडाईच्या वतीने आयोजित 'कल्पवृक्ष' या वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अनंत राजेगावकर, नेमीचंद पोद्दार, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, अंजन भालोडीया,ङ्गसमाधान जेजुरकर हे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, जग वाचवायच असेल तर वृक्षारोपणाचे काम निरंतर करावं लागणार आहे. त्यासाठी क्रेडाईने सामाजिक बांधिलकीतुन एक महत्वाचं पाऊल उचललं आहे.

वृक्षारोपण करतांना आपण किती झाड लावली याला महत्व नाही तर किती जगविली याला अधिक महत्व आहे. त्यामुळे जेवढी झाड लावली तेवढ्या झाडांची काळजी घेऊन ती जगविली पाहिजे. यासाठी सामूहिक जबाबदारीतुन हा कार्यक्रम हाती घेऊन झाड वाचविले पाहिजे, कारण आपण जे करू त्याचा फायदा समाजाला होणार आहे. त्यामुळे लावलेल्या झाडांचे चांगलं संगोपन करा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

क्रेडाईच्या माध्यमातून नाशिकमध्ये कल्पवृक्ष योजनेच्या माध्यमातून 15 ते 28 ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून 10 हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रवी महाजन यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com