स्वच्छतादूत गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर

स्वच्छतादूत गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर

कळवण | किशोर पगार Kalwan

पर्यावरणाचे संतुलन राखणारा स्वच्छतादूत (Environmental balance cleaner ) म्हणून ओळखल्या जाणार्‍या गिधाड (vulture )पक्ष्याबरोबर अनेक पक्षी, प्राणी काळाच्या ओघात दुर्मिळ होत आहेत. यासाठी वनविभागाने ( Department of Forest ) वनांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ निर्माण करणे आवश्यक आहे. बेसुमार वृक्षतोड अन् त्यातून होणार्‍या पशुपक्ष्यांच्या दुर्मिळतेमुळे पर्यावरणाविषयी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

घनदाट जंगलात मुक्तपणे विहार करणारा गिधाड पक्षी उघड्यावर पडलेल्या मृत जनावरांची चामडी काढून नेल्यावर गिधाड पक्षीच उर्वरित मांसाचा फडशा पाडतो. त्यामुळे या उघड्यावरील मांसामुळे सुटणारी दुर्गंधी आणि रोगराई नष्ट होण्यास मदत होते. परिणामी मानवी आरोग्य व पर्यावरणाचे संतुलन राखण्यात गिधाडे यशस्वी होतात हे सत्य आहे. आजच्या काळात पर्यवरणाचे रक्षण करणारे गिधाड पक्षी दृष्टीस पडणे अवघड झाले आहे.

हवामानातील बदल तसेच आधुनिकीकरणामुळे पशुपक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. पर्यावरण संतुलनाचा र्‍हास होत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दरम्यान, शासनस्तरावरून विविध अभियान राबवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अपुरे पडत आहेत. पशुपक्ष्यांच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज आहे. यासाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे.

पर्यावरण समतोल राखण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगबाबत वारंवार चर्चा होते, मात्र त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यास शासन व नागरिक असमर्थ ठरत असल्याने वन्यप्राणी दुर्मिळ होत चालले आहेत. जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक संस्थांनी विविध क्षेत्रात काम करणार्‍या आर्थिक संस्था, गणेश मंडळे यांनी आपापल्या शेजारी शासकीय वने दत्तक घेऊन कुर्‍हाडबंदी योजना राबवून जंगलवाढीसाठी व पर्यावरण समृद्ध होण्यासाठी सहकार्य करावे, परिणामी वन्यजीवांचे आपोआप संरक्षण होईल.

यादृष्टीने गिधाड हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे घनदाट अरण्यापासून दुरावलेला आणि उंच आकाशत दिमाखात घिरट्या घालून अन्नाच्या शोधार्थ भ्रमण करत असतात. आज खर्‍या अर्थाने पर्यवरणाचा स्वच्छतादूत गिधाड दुर्मिळ होत चालला आहे.

भारतात गेल्या 15 ते 20 वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भीती पक्षी निरीक्षक व पक्षीप्रेमींना वाटते. औषधे व रसायनांमुळे पाळीव प्राणी मरतात. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो, म्हणून गिधाड वाचवले पाहिजे.

गिधाडे ही नैसर्गिकरीत्या कचरा निर्मूलन करणारी एक महत्त्वाची प्रजाती आहे. म्हणून पर्यावरणाचा स्वच्छतादूत गिधाड हे दुर्मिळ होत चालले आहे. यावेळी महाराष्ट्र निसर्ग व पर्यावरण विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी सांगितले की, पर्यावरण समतोल राखण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगबाबत वारंवार चर्चाच होते, मात्र त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यास शासन व नागरिक असमर्थ ठरत असल्याने वन्यप्राणी दुर्मिळ होत चालले आहेत.

निसर्गप्रेमी किरण पगार यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी एखादे भांडे पाण्याने भरून ठेवावे. तसेच घरातील उरलेले अन्न गटारीत न फेकता पक्ष्यांसाठी घराच्या वर ठेवावे. तसेच ग्रामपालिकेने घर तेथे झाड ही योजना राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.