येवला फेस्टिव्हलमध्ये पर्यावरण जनजागृती

येवला फेस्टिव्हलमध्ये पर्यावरण जनजागृती

येवला | प्रतिनिधी | Nashik

येथील सामाजिक बांधिलकी (Social commitment) जपणारा राजा न्यु डिस्को फ्रेंडस् सर्कलच्या (Raja New Disco Friends Circle) वतीने दरवर्षीप्रमाणे

यंदाही गणेशोत्सव (ganeshotsav) निमित्त बुरुड गल्ली येथे येवला फेस्टिव्हलचे (festival) आयोजन करण्यात आले. यात सांंस्कृतिक (cultural), धार्मिक (religious), कला (art), पर्यावरणविषयक (Environment) तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.

पर्यावरणाविषयी जनजागृती (Environmental awareness) व्हावी म्हणून रविवारी( दि.4) वृक्षारोपण (tree plantation) कार्यक्रम व रोपवाटप करण्यात आले. तसेच एक कार्यकर्ता, एक वृक्षारोपण मोलाचे ही संकल्पना राबविण्यात आली. महिलांसाठी डोळे बांधून टिकली लावण्याची स्पर्धा घेण्यात आला. हा खेळ सावल्यांचा हा कार्यक्रम 6 ते 8 तारखे दरम्यान व्यंंगचित्रकार प्रभाकर झळके सादर करणार आहेत. त्यानंंतर अन्नदान होणार आहे.

9 रोजी वाजत गाजत श्री गणेशाचे विसर्जन (Immersion of Lord Ganesha) पारेगांव येथील दगड खाणीमध्ये होणार आहे. फ्रेंडस् सर्कलचे संस्थापक अध्यक्ष राम तुपसाखरे, उपाध्यक्ष मुकेश लचके, खजिनदार गोकुळ गांगुर्डे, उपखजिनदार मिलींद सदावर्ते, कार्यवाहक संतोष जेजुरकर, उपकार्यवाहक गणेश खैरे, मार्गदर्शक प्रभाकर झळके र, दत्तात्रय नागडेकर, डॉ.गणेश वाघ, किशोर सोनवणे, कैलास बकरे, पुरुषोत्तम रहाणे, कार्यकारणी सदस्य संजय वाळुंज, परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com