माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

ओझे | वार्ताहर | Oze

ग्रामपंचायत ढकांबे (Dhakambe) येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या आदेशान्वये व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार (Chandrakant Bhavsar) यांच्या मार्गदर्शनाखाली "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला...

गणेश विसर्जनाच्या (Ganesh Idol Immersion) पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे भाविकांना बाणगंगा नदी किनारी दोन कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. नाशिक (Nashik) व म्हसरुळ (Mhasrul) परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती.

यावेळी सर्व गणेश मूर्तीचे संकलन करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्ती व नैसर्गिक रंग वापरुन बनविलेल्या मूर्ती बसवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच भाऊसाहेब गांगोडे, उपसरपंच विलास गांगुर्डे, सदस्य अनिल धात्रक, दिपक पोटिंदे, शिनाबाई आव्हाड, सुशीला सानप, ग्रामसेवक रमेश राख, पोलीस पाटील निलेश बोडके यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com