गद्दारांची अवस्था न घरका न घाटका: विजय करंजकर

गंजमाळ, भिमनगरचे शेकडो तरुणांचा युवासेनेत प्रवेश
गद्दारांची अवस्था न घरका न घाटका: विजय करंजकर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पक्षाशी गद्दारी करणार्‍या आमदार (MLA) आणि खासदारांना (MP) काही काळ सुखावह वाटले असले तरी अजूनही अनेकांना मंत्रीपदे (ministerial posts) न मिळाल्याने त्यांची अवस्था न घरका न घाटका अशी झाली असून ते स्वतःच्या नशिबाला दोष देत आहेत,

असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray group of Shiv Sena) जिल्हाप्रमुख विजय करंजकर (District Chief Vijay Karanjkar) यांनी केले.

मध्य नाशिक विधानसभा (Central Nashik Assembly) क्षेत्रातील गंजमाळ, भिमवाडी परिसरातील शेकडो तरुणानी मान्यवराच्या उपस्थित युवासेनेत (Yuva Sena) प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या हाती शिवबंधन बांधतांना करंजकर बोलत होते. व्यासपीठावर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Metropolitan Chief Sudhakar Badgujar), माजी आमदार वसंत गिते (Former MLA Vasant Gite), माजी महापौर विनायक पांडे (Former Mayor Vinayak Pandey), विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, समन्वयक मसूद जिलानी, युवासेना महानगर आधिकारी ऋतुराज पांडे, राहूल दराडे आदी होते.

आमच्या गटाचे सर्व लोकप्रतिनिधी निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर प्रेम करणारे असून ते फुटणार अशी आवई उठविणारे गद्दार सपशेल तोंडावर आपटले आहेत. यापुढे तरी असा बालिशपणा त्यांनी करू नये, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. युवासेनेत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा उचित सन्मान बाळगला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत लोक गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Uddhav Balasaheb Thackeray group) निर्विवाद बहुमत मिळेल, असा विश्वास माजी आमदार वसंत गिते यांनी व्यक्त केला. तर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज राहावे,असे आवाहन विनायक पांडे यांनी केले.

युवासेनेत प्रवेश करणार्‍यांमध्ये पवन पाईकराव, संदीप गाडेकर,शाम चव्हाण,अमन मोरे,शाहिर जावळे, सूरज लाडे,भिमा पाथरे,गुलाब गायकवाड,सतीश साळवे,सोनू काबळे,अनुराग सहजराव,सचिन पगारे, आकाश काळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com