'महाराष्ट्र उद्योगरत्न' पुरस्काराने उद्योजकांचा गौरव

'महाराष्ट्र उद्योगरत्न' पुरस्काराने उद्योजकांचा गौरव

सातपूर । प्रतिनिधी Satpur

उद्योग व्यवसायात कौतुकाची थाप मिळाल्याने उंच भरारी घेण्यास ऊर्जा मिळते. सध्या मी कलाकार आहे. पण मला उद्योजक व्हायचेय ते झाल्या नंतर तुम्ही मला पुढील वर्षी नक्की पुरस्कार द्याल असा विश्वास मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Film Actress Sonali Kulkarni )यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातील 60 उद्योजकांना Entrepreneurs 'महाराष्ट्र उद्योगरत्न' पुरस्कार ( Maharashtra Udyogratna Award ) देऊन सम्मानित करण्यात आले.

सिटी सेंटर मॉल ( City Center Mall ) येथील हॉलमध्ये रिसील डॉट इनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार वितरण केले जाते. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलत होत्या .

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे विभागीय अधिकारी दत्तात्रय थावरे , पार्क साईडच्या संचालिका श्रेया शाह, भारत एटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम श्रीराम, आयोजक सुधीर पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोनाली पुढे म्हणाल्या की पुरस्कार म्हणजे मूलभूत गरज आहे . यामुळेच कौतुकाची भूख भागविली जाते. यामुळे उत्तम कामगिरीचे कौतुक झालेच पाहिजे. रिसिल डॉट इन पुरस्कार देऊन खरोखर उद्योजकांना पुढे जाण्याची चालन देत असल्याचे सांगितले.

प्रास्तविक करतांना आयोजक सुधीर पठाडे यांनी रिसील डॉट इन च्या माध्यमातून आम्ही गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. उद्योजकांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील इतरांनीही घ्यावी व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील उद्योजकांना जोडून एक मोठ कार्य उभ करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार नामांकन प्राप्त झाले होत. त्यातुन साठ पुरस्कार्थीची निवड करून त्यांना गौरविण्यात आले .या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com