तयार उत्पादने वितरणासाठी उद्योजक व्यस्त

तयार उत्पादने वितरणासाठी उद्योजक व्यस्त

सातपूर । प्रतिनिधी

जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या दहा दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग क्षेत्रालाही समाविष्ट केल्याने उद्योग क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र शासनाच्या आदेशामुळे काल दिवसभर उद्योग क्षेत्रातून तयार मालाची वितरण करण्याची गरज लगबग दिसून आली.

आगामी दहा दिवसांमध्ये उद्योग क्षेत्राच्या हालचाली शिथिल होणार असल्याने उद्योजकांची तयार उत्पादन पोहोचवण्याकडे कल दिसून आला. तर काही उद्योगांनी निवडक कामगारांच्या निवासाची व्यवस्था करून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवण्याचा विचार केल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने नियोजनामध्ये कालचा दिवस व्यस्त दिसू राहिला. औद्योगिक संघटना पदाधिकार्‍यांनी सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन उद्योग क्षेत्र यातून वगळावे अशी मागणी केली आहे. त्यात प्रामुख्याने निर्यातदारांना सवलत देण्याची मागणी करण्यात आली.

निर्यातदार सापडले कात्रीत

जिल्ह्यात अनेक उद्योग निर्यातक्षम झाले आहेत. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या उत्पादनांची मागणी मिळवण्यासाठी अनेक वर्षे घालवली आहेत. या मागणीचा पुरवठा करण्याची गती पहिल्या कोविडच्या बंद नंतर रुळावर येत असतानाच लॉकडाऊन सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली व्यवसायाची संधी गमावली जाण्याच्या भीतीमुळे उद्योजक धास्तावल्याचे चित्र आहे.

मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर उद्योगक्षेत्राची गाडी रुळावर आणताना त्यांना मोठी अडचण झाली. बहुतांश उद्योगांमध्ये उत्पादनाचा सायकल हे शंभर दिवसांचे असतं गेल्या काही कालावधीत हे सायकल सुरळीत येण्याची चिन्हे असताना पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत असल्याने प्रक्रियेत बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळे उद्योगांना खर्‍या अर्थाने स्थैर्य मिळत असताना पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

वरूण तलवार, अध्यक्ष आयमा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com