संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत उद्योजक सतर्क

संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत उद्योजक सतर्क

सातपूर । प्रतिनिधी Satpur

कोविडच्या ( Covid ) संभाव्य तिसर्‍या लाटेपुर्वी सावधानता बाळगण्यासाठी एमआयडीसी ( MIDC )व जिल्हा उद्योग केंद्र ( District Industries Center )यांच्या संयुक्त विद्यमाने आयमा रिक्रिएशन सेंटर बैठक (Meeting in AIMA Recreation Center )घेण्यात आली.

शासनाने उद्योगक्षेत्र सुरळीत ठेवण्याच्या संकेत दिले असल्याने उद्योग क्षेत्र सुरू ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाच्या निर्देशांची माहिती देण्यात आली. त्यात प्रामुख्याने उद्योग क्षेत्रासाठी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. अधिकार्‍यांनी सूचना देताना उद्योगक्षेत्र सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्याची माहिती दिली.

त्यात प्रामुख्याने उद्योजकांनी कामगारांना निवासाची व्यवस्था कारखाना परिसरात करावी, त्यांना घरून आणणे व नेण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करावी, कामगारांच्या स्वास्त्याबाबत जागरूकता बाळगावी, कामगार कर्मचारी अधिकारी व मालकांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे, लघु व मध्यम उद्योजकांनी एकत्रित येत मोकळ्या जागा अथवा खासगी जागांमध्ये निवास व्यवस्था उभारावी आदी मार्गदर्शक सूचना यावेळी देण्यात आल्या.

याबाबत आयमाच्या वतीने उद्योजकांना आवाहन करण्यात आले असून जवळपासच्या सर्वच हॉटेल्समध्ये सवलतीच्या दारात रूम उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. लघु व मध्यम उद्योग एकत्रित येऊन ठिकाणी निवासाची व्यवस्था करता येण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक राजपूत सहाय्यक उपसंचालक उपेंद्र दंडगव्हाळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल, दवंगे तसेच आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे आयमा उपाध्यक्ष निखिल पांचाळ सरचिटणीस ललित बूब राजेंद्र अहिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com