
नाशिक । प्रतिनिधी Nashik
उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या निर्घृण खुनाचा (Murder of Entrepreneur Nandkumar Aher ) उद्योजक तसेच व्यापारी संघटनांच्या बैठकीत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ( Police Commissioner Jayant Naiknavare ) यांनी उद्योजकांच्या बैठकीस हजेरी लावली. उद्योजकांच्या भावना जाणून घेतल्या. आयुक्तांच्या उपस्थितीने आणि आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
बैठकीत व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाल, आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे, चेंबरचे संजय सोनावणे, एमएसएमईचे सदस्य प्रदीप पेशकार, नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे सचिव निखिल तापडिया, निवेकचे माजी अध्यक्ष संदीप सोनार , उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, सीसीआयचे माजी अध्यक्ष सुधीर मुतालिक, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, डी.जी.जोशी उपस्थित होते.
सुरुवातीला नंदकुमार आहेर यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली. उपस्थित उद्योजकांनी आहेर यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. बैठक सुरू असताना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी बैठकीला भेट दिली. आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ आणि बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी मंगळवारी घडलेल्या प्रकाराने उद्योजक प्रचंड दहशतीखाली असून त्यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तांनी उद्योजकांच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या.
बैठकीस आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, खजिनदार राजेंद्र कोठावदे, माजी अध्यक्ष विवेक पाटील, डी.डी.गोपाळे, राजेंद्र अहिरे, सचिव योगिता आहेर, किरण शृंगारकर, लोकेश पिचाया,लक्ष्मीकांत मूर्ती, लोकेश शेवडे, डी.जी. जोशी, पी. बी. गुरदडी, योगेश जोशी, मिलींद देशपांडे, संजय महाजन, जयप्रकाश जोशी, सतीश खात्री, रवीन्द्र झोपे, गोविंद झा, विनायक मोरे, समीर पटवा,अजय यादव,अमित शेट्टी, हेमंत पाटील, विरल ठक्कर, वैभव चावक,हेमंत खोंड,विराज गडकरी, महेश आहेर, उन्मेष कुलकर्णी,विशाल माहिमकर, अभिजित माहीमकर,भारत येवला, अविनाश मराठे, अमित आरोटे, डी.आर.चक्रवर्ती, रोहित प्रधान, सुमित दळवी, कुंदन डरंगे, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, विजय बोडके, अविनाश बोडके, गणेश भागवत, गौरव धारकर, हर्षद ब्राह्मणकर, प्रकाश बारी आदी उपस्थित होते.
आयुक्तांकडून शंका समाधान
उद्योजकांवर कंपनीच्या दारात येऊन प्राणघातक हल्ला करुन खून करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने उद्योजक चिंतीत झाले आहेत. सर्वच उद्योजक संघटनांनी त्याविरोधात भालेकर मैदानावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस आयुक्तांनी बैठकीला येऊन उद्योजकांच्या शंकांचे समाधान केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
विविध मागण्या
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा, यासाठी उद्योजकांनी सामूहिक अर्ज करावेत, उद्योजकांनी आपली एकजूट दाखवून द्यावी, या भागासाठी मंजूर पोलीस ठाणे औद्योगिक वसाहतीत उभारावे, सिमेन्स ते घरकुल योजना परिसरात होणारा टवाळखोरांचा उपद्रव थांबवावा, औद्योगिक तंटे सोडवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, औद्योगिक वसाहत परिसरात उच्च दर्जाची सीसीटीव्ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करावी, मोकळ्या भूखंडांवरील गुन्हेगारांच्या अड्ड्यांना पायबंद घालावा, औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग वाढवावी, मोठ्या प्रमाणात बीट मार्शल नेमावेत, बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी, उद्योगजगतात नाशिकची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून सामुदायिक प्रयत्न करावेत, उद्योजकांनीही कारखान्यात नीतीमत्ता जोपासावी आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
औद्योगिक तंट्यांसाठी नोडल ऑफिसर
औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपूर व अंबडचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या ठाण्याला औद्योगिक वसाहत, असे नाव देण्याचा प्रयत्न करू, बंद पोलीस चौकी पुन्हा तातडीने सुरू करू. टवाळखोरांचा चोख बंदोबस्त करण्यात येईल.
- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त