उद्योजक याग्निक शिंदे यांची आत्महत्या

उद्योजक याग्निक शिंदे यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत केला होता प्रवेश

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपला (BJP )सोडचिठ्ठी देत मनसेत ( MNS ) प्रवेश केलेल्या उद्योजक याग्निक शिंदे (Entrepreneur Yagnik Shinde) यांनी गंगापूर रोड वरील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे उद्योजक याग्निक शिंदे ( दि.13 ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सम्राट ट्रॅपिकोना सी, विंग दहावा मजला, गंगापूर रोड येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान गेल्या वर्षीच त्यांचे वडील उद्योजक नंदू शिंदे यांनी मानसिक तणावात येत सटाण्याजवळ त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये स्वतःला गोळी मारुन घेत आत्महत्या केली होती. यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन नुकताच पार पडला. नंदू शिंदे यांच्या निधनानंतर याग्निक याने कुटुंबाची जबाबदारी घेत सर्वांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता व नवीन व्यवसायातून स्वतःची वाटचाल सुरू केली होती.

गेल्या पंचवार्षिक मध्ये प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपाकडून त्यांनी उमेदवारी केली होती.नुकताच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला होता व मनपा निवडणुकीसाठी ते इच्छुक उमेदवार होते. त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.