रम्मी राजपूतच्या नावाने उद्योजकाला धमकी; मांडवलीसाठी मागितली दोन कोटींची खंडणी

रम्मी राजपूतच्या नावाने उद्योजकाला धमकी; मांडवलीसाठी मागितली दोन कोटींची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एका उद्योजकाकडे प्लॉटवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी कुख्यात गुंड रम्मी राजपूतच्या (Rammy Rajput) नावाने धाक दाखवल्याची घटना घडली आहे. याबाबत उद्योजकाने केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश धीरवाणी (Rupesh Dhirwani) (४०) व मोहनलाल पहुजा (Mohanlal Pahuja) (४०) अशी संशयित खंडणीखोरांची नावे आहेत…

फिर्यादीवरून, सातपूर औद्योगिक वसाहतीतील लापसिया कारखान्यातील ईश्वर श्यामची लापसिया (रा. सावरकरनगर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लापसिया काम करीत असलेल्या कारखान्याच्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत संशयितांकडून या जागेवरील कब्जा सोडविण्यासाठी लापसिया व त्यांचे मालक सुरेश शहा यांना धमकाविले जात आहे.

गेल्या महिनाभरापासून संशयितांकडून मोबाइलवर संपर्क साधला जात असून, ते भूमाफिया रम्मी राजपूत याचे नाव सांगून जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. मांडवलीपोटी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.