ग्रामपंचायत निवडणूक : दुपारनंतर मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह

ग्रामपंचायत निवडणूक : दुपारनंतर मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) मतदानास आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदारांचा कमी प्रमाणात प्रतिसाद होता. मात्र दुपारच्या वेळी मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) ५७ पैकी ५४ ग्रामपंचायतींमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७८ टक्के मतदान (Voting) झाले होते. याठिकाणी ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता.

तसेच सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) ६१ पैकी ५९ ग्रामपंचायतींमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाले होते. तर पेठ तालुक्यात (Peth Taluka) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७९.३० टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, सरपंचपदासह सदस्यपदाची देखील निवडणूक होत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येते. तसेच उद्याच (दि.१७) या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com