
नाशिक | Nashik
आज वटपौर्णिमेचा (vat purnima) सण असल्याने शहरासह जिल्हाभरात उत्साहात साजरा होताना पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतांना दिसतात...
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिला (woman) अनेक महिला सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून व्रताची सुरुवात करतात. त्यानंतर वटवृक्षाची पूजा करत वडाला (Banyan) फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करतात.
दरम्यान, आज शहरातील विविध भागांत महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून पतीच्या (Husband) दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसून आल्या. यावेळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी (Crowd) केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वटपौर्णिमेची अशी आहे आख्यायिका
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षाचे वय शेकडो वर्षे असते. आपल्या पतीलाही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि आपल्या कुटुंबाचा (family) आनंद वटवृक्षासारखा हिरवागार ठेवायचा असल्याने त्या हे व्रत (Vrat) पाळतात. त्याचवेळी, दुसऱ्या कथेनुसार, सावित्रीने वटाखाली बसून तपश्चर्या करून पतीचे प्राण वाचवले होते, म्हणून वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताला वटवृक्षाची (वटवृक्षाचे आरोग्य फायदे) पूजा केली जाते.