
सातपूर । प्रतिनिधी Satpur
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी मातेच्या यात्रेचा(Bhavani Mata Yatra festival, Satpur ) उत्सव प्रचंड उत्साहात संपन्न झाला गणेशाने बारा गाड्या ओढून या उत्सवाची सांगता केलीअर्धनारी नटेश्वराच्या वेशभूषेत निगळ घराण्यातून गणेशा ची वेशभूषा साकारण्याची परंपरा संदीप मारुती निगळ यांनी साकारली होती.
त्यानुसार संदीप निगळ यांची गणेशाचे रूप साकारत सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . सातपूर गावातील हनुमान मंदिर, भवानी मंदिर, महादेव नगरातील महादेव मंदिर वेताळबाबा मंदिर यांचे दर्शन घेत गणेशा ची मिरवणूक औद्योगिक वसाहतीतील संतोषी माता टेकडीवर असलेल्या भवानी माता मंदिरापर्यंत नेण्यात आली.
या ठिकाणी पुरातन असलेल्या मूर्तीची गणेशाच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर पूजा करून गणेशा धावतच सातपूर त्रंबक रोडवर परस्परांना बांधून ठेवलेल्या बारा गाड्यांच्या दर्शन घेऊन त्या गाड्या उडत विसावा केंद्रापर्यंत नेल्या स्थळापर्यंत नेल्या या ठिकाणी बारा गाड्या सोडून गणेशांची मिरवणूक गावातील प्रत्येक गल्लीतून काढण्यात आली व ग्रामस्थांनी भक्तिभावाने त्यांची आरती करून दर्शन घेतले.
या बारा गाड्यांचे दर्शन घेऊन नवस करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात राजकीय घडामोडींना गती आलेली असताना राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वच नेत्यांना ही यात्रा प्रिय दिसून येते यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचाही त्यामागे हेतू असतो या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते दर्शनासाठी हजेरी लावताना दिसून येतात.
दर्शनासाठी खासदार हेमंत गोडसे मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आमदार सीमा हिरे सुधाकर बडगुजर तसेच दिनकर पाटील सलीम शेख योगेश शेवरे विलास शिंदे प्रकाश लोंढे डॉक्टर डी एल कराड भागवत आरोटे सीमा निगळ शशी जाधव रंजन ठाकरे दशरथ पाटील डॉक्टर प्राची पवार सुवर्णा मटाले वृषाली सोनवणे आदींसह विविध पक्षांचे नेते यावेळी दर्शनासाठी उपस्थित होते आयोजन समितीच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्या सोबतच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण व टीमने चौक बंदोबस्त ठेवला होता यात्रा उत्सवात अडथळा ठरू नये म्हणून महेंद्रसलकर वरून वाहतूक औद्योगिक क्षेत्राकडून वळवण्यात आली होती
सुपरस्टार अमिताभ बच्चन अडकले होते यात्रेत
त्र्यंबकेश्वर जवळील निसर्गरम्य परिसरात खाकी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन व ऐश्वर्या रॉय हे दहा ते बारा वर्षांपूर्वी नाशिक मध्ये आले होते शूटिंगला जाताना त्र्यंबकेश्वर रस्ता मोकळा होता मात्र शूटिंग सायंकाळी परतताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बारा गाड्यांची यात्रा असल्याने त्यांना वाट मिळाली नाही आणि यावेळी त्यांना दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ करण्यामध्ये बराच कालावधी अडकला होता सुपरस्टार अमिताभ बच्चन आल्याची समजतात भाविकांची त्या दिशेने गर्दी जमू लागल्याचे चित्र होते.