सातपूरच्या भवानी माता यात्रोत्सवात नागरिकांचा उत्साह

बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा
सातपूरच्या भवानी माता यात्रोत्सवात नागरिकांचा उत्साह

सातपूर | प्रतिनिधी Satpur

सातपूर( Satpur ) गावची शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या गुढीपाडव्याच्या ( Gudhipadva) बारागाड्याची यात्रा ( Baragadya Festival ) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ (District Guardian Minister Chhagan Bhujbal )व खा. संभाजी राजे यांचे सूपूत्र राजे शहाजी महाराज ( Raje Shahaji Maharaj, son of MP Sambhaji Raje )यांची विशेष उपस्थिती होती.

शेकडो वर्षांपासून सातपूर गावच्या भवानी माता यात्रेत बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे.या परंपरेत निगळ घराण्यातील युवक अर्धनारी नटेश्वराची वेषभूषा धारण करुन परिसरातील सर्व देवस्थानाचे दर्शन घेतले.त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील टेकडीवर असलेल्या भवानी माता मंदीरात भवानी मातेची पूजा केली.

त्यानंतर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भोलेनाथ हॉटेल समोर एकमेकांना बांधलेल्या बारा गाड्यांचे दर्शन घेऊन त्यांना ओढून सातपूर राजवाडा येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर पूतळ्यासमोर असलेल्या गणेशा मंदिराजवळ विसावा येथे आणल्या. त्याठिकाणी विसावा घेत त्यानंतर सातपूर गावातून विजय मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक घरातून त्यांचे औक्षण करण्यात आले.

यंदाच्या यात्रोत्सवाला दोन कारणांनी नागरीकांनी गर्दी केली होती. दोन वर्षांच्या कोविडच्या खंडामुळे काल यात्रोत्सवात नागरीकांचा कमालीचा उत्साह पहायला मिळाला. त्यासोबतच भवान माता मंदिराच्या डागडूजी दरकम्यान सापडलेल्या भवानी मातेच्या दगडी मुखवट्यामुळे नागरीकांमध्ये भवानी माते बद्दलची श्रध्दा वाढलेली पहायला मिळाली.

निवडणूकीच्या पूर्वी यात्रोत्सव असल्याने विद्यमान व इच्छुक उमेदवारंनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले होते. या यात्रोत्सवात बारा गाड्यांच्या दर्शनासाठी आ.सिमा हिरे,आ.देवयानी फरांदे,आ.राहुल ढिकले,आ.सरोज अहिरे आदींसह परिसरातील नगरसेवक लोकप्रतिनिधी अधिकारी व नागरीक मोठ्या संख्यने गर्दी करुन होते.

उद्या कुस्त्यांची दंगल

बारा गाड्यांच्या येत्रेनंतर दूसर्‍या दिवशी कुस्त्यांची दंगल भरवण्याची परंपरा आहे. त्यानुसार भवानी मातेच्या मंदिरालगत कुस्त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी विशेष लाल मातीचे कुस्ती मैदान तयार करण्यात आलेले आहे.

उत्सव यशस्वितेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घाटोल, त्र्यंबक भंदूरे,सागर प्रकाश निगळ तसेच सातपूर जत्रा उत्सव समितीचे सदस्य शांताराम निगळ, राजाराम पाराजी निगळ ,गोकुळ नामदेव निगळ, प्रकाश निगळ, विजय भंदूरे, सचिन घाटोळ, शशिकांत घाटोळ, गणेश निगळ, भिवानंद काळे, अनिल मौले, सुरेश भंदूरे, रवी काळे, बजरंग शिंदे, अरुण काळे, अ‍ॅड कपिल निगळ आदींसह सातपूर गावचे ग्रामस्थ प्रयत्नशिल होते.

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बारा गाड्यांच्या यात्रा होत असल्यामुळे वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला होता.सकाळ सर्कलपासून त्र्यंबक कडे जाणार्‍या व महिंद्र सर्कल पासून नाशिक कडे जाणार्‍या वाहनांना औद्योगिक वसाहतीतून वळवण्यात आले होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सायंकाळी साडेसहा वाजेपासून ‘गणेशा’सह नागरिकही कंटाळले होते. भवानी मातेच्या यात्रेला पहिल्यांना तब्बल दीड तासांच्या अवकाशाने ‘गणेशा’ने बारागाड्या ओढल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.