सोने, घरे, वाहन खरेदीत उत्साह

नाशिककरांच्या प्रतिसादाने बाजारपेठेत चैतन्य
सोने, घरे, वाहन खरेदीत उत्साह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या विजयादशमी Vijyadashmi म्हणजेच दसरा सणाच्या Dussehra festival मुहूर्तावर नाशिकमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चैतन्य संचारले होते.

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. तसेच ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी सराफी पेढी चालकांकडून विविध योजना सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र शहरातील सर्वच सुवर्णपेढ्यांमध्ये दिसून आले. याशिवाय ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक शोरूम्स तसेच बांधकाम व्यवसायासह सर्वच क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या आमच्याकडे सुरू असलेल्या चैन महोत्सवास प्रचंड प्रतिसाद मिळत असून हा महोत्सव दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे दसर्‍याला खरेदी करू न शकलेल्या ग्राहकांना अजूनही दिवाळीपर्यंत खरेदीची संधी उपलब्ध आहे.

शुभंकर टकले, संचालक, टकले ज्वेलर्स

नवरात्रीपासून सुवर्ण पेढ्यांतील व्यवहारांना गती येऊ लागली आहे. दसर्‍याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असून दिवाळीत अजून जास्त प्रमाणात ग्राहक सोने खरेदी करतील असा अंदाज आहे. आज चोख सोने तसेच छोटे दागिने खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून आला.

संकेत वडनेरे, संचालक, वडनेरे ज्वेलर्स

काही दिवसांपूर्वी चौकशी करून गेलेल्या ग्राहकांनी आजच्या शुभमुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली. करोना काळानंतर नागरिक आता खरेदीस उत्साहित असून दिवाळी पर्यंत हा उत्साह अजून वाढेल अशी आशा आहे.

हेमंत धात्रक, संचालक, धात्रक बिल्डर्स

वाहन बाजारपेठेत दसर्‍यानिमित्त चांगलीच वर्दळ झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून वाहनांच्या बुकिंगसाठी गर्दी होत आहे. चारचाकी खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली असून. ग्राहकांचा असाच प्रतिसाद राहिल्यास दिवाळी सणात या खरेदीच्या उत्साहात नक्कीच भर पडू शकते.

दिनेश वराडे, संचालक, साची होंडा

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांनी अनेक साईट्स वर भेट दिली होती. त्यातील अनेक जणांनी आजचा मुहूर्त साधून घर बुक केले. या पुढील काळात ग्राहकांचा अजून चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटते.

सुनील जाजू, संचालक, ऋषिकेश डेव्हलपर्स

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com