मुला-मुलींमध्ये लसीकरणासाठी उत्साह

आरोग्य केंद्रांसह सर्व विद्यालयांमध्ये लसीकरणाची सोय : डॉ. ठाकरे
मुला-मुलींमध्ये लसीकरणासाठी उत्साह

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी मनपा आरोग्य विभागातर्फे (Department of Health) आजपासून लसीकरण मोहिमेस (Vaccination campaign) प्रारंभ केला गेला.

येथील मसगा महाविद्यालय व केबीएच विद्यालयात केंद्र सुरू करत विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लसीकरण (vaccination) सुरू केले गेले. करोना (corona) प्रतिबंधासाठी लसीकरण आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये (students) लसीकरणासाठी मोठा उत्साह दिसून आला सोयगाव (soygaon), कॅम्प नागरी आरोग्य केंद्रासह मनपा जुन्या सभागृहात देखील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 1 हजार 779 मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. करोना प्रतिबंधासांठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. लसीचे कुठलेही दुष्पपरिणाम दिसून आलेले नाही.

ओमायक्रॉनसह (omicron) करोनाची तिसरी लाट (hird wave of Corona) रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर (Rumors) विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच शाळेतील (school) एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शाळा, विद्यालयांनी घेण्याचे आवाहन मनपा आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे (Health Officer Dr. Sapna Thackeray) यांनी येथे बोलतांना केले.

येथील केबीएच विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणाचा शुभारंभ मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. ठाकरे बोलत होत्या. मनपा उपायुक्त राजू खैरनार, प्राचार्य प्रविण पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण अभियान मनपातर्फे हाती घेण्यात आले असून शहरातील सर्व शाळा, विद्यालयांमध्ये तसेच नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय केली जाणार आहे. मुला-मुलींचे लसीकरण शंभर टक्के व्हावे या दृष्टीकोनातून आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपायुक्त राजू खैरनार यांनी देत लसीकरणासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल विद्यालयासह विद्यार्थ्यांचे आभार मानले.

मसगात 831 तरूण लसवंत

येथील मसगा महाविद्यालयात मनपा आरोग्य विभागातर्फे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला. महाविद्यालयात लस देण्यासाठी चार केंद्र सुरू करण्यात आले. 900 पैकी 831 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी पहिला डोस घेतला. तिसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सीनचा डोस घेण्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मुलींमध्ये खुशबू देवरे या विद्यार्थीनीने तर मुलांमध्ये विशाल दुकळे या विद्यार्थ्यांना पहिला डोस देत मोहिमेचा शुभारंभ केला गेला.

यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, वैद्यकिय अधिकारी सुनीता रोकडे यांनी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी लक्ष घातले जाणार असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक रविंद्र मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. लसीकरणासाठी मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका योगिता निकम, सुरेखा शिनकर, डेटा ऑपरेटर वृषाली सोनवणे, हर्षल तायडे तसेंच आशासेविका निर्मला देसले, संगिता खैनार, संगीता वडनेरे आदी उपस्थित होते. लस घेणार्‍या विद्यार्थ्यांना मसगातर्फे बिस्किटांचे वाटप केले गेले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मिलींद पवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com