अंतिम निकालपत्रकात अंतर्गत गुणांचा समावेश करणार !

अंतिम निकालपत्रकात अंतर्गत गुणांचा समावेश करणार !
निकाल

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या प्रथम सत्राचा निकाल शुक्रवारी (दि. २१) जाहीर केला.

या निकालात अंतर्गत गुणांचा अंर्तभाव करण्यात आलेला नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्‍या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्‍पष्टीकरण महाविद्यालयांकडून दिल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

करोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अशात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या परीक्षा विलंबाने होत आहेत. नुकताच एप्रिल महिन्‍यात ऑनलाइन स्‍वरूपात विविध शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा विद्यापीठाने घेतली.

या शैक्षणिक वर्षाच्‍या प्रथम सत्राच्‍या परीक्षा पार पडल्‍या असून, बुधवारी (दि. २१) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. मात्र या निकालात अंतर्गत गुण नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्‍थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात महाविद्यालयाकडे अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क साधला.

विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याची आवश्‍यकता नाही. शैक्षणिक वर्षाच्‍या द्वितीय सत्राची परीक्षा झाल्‍यानंतर एकत्रित निकाल पत्रकात या गुणांचा समावेश असेल, अशी माहिती दिल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com