नाशिक । Nashik

चहा घेणार का? असा एखाद्याने विचारल तर माणूस नाही म्हणतच नाही.पण चहाचा व्यवसाय करणार का? तर अनेकजण नाक मुरडतात. पण याला अपवाद ठरली ती सायखेडा येथील रुपाली शिंदे.

निफाड तालुक्यातील सायखेडा जवळील शिंगवे हे रुपाली शिंदेच गाव. केमिकल इंजिनीअर असलेल्या या तरुणीने पदवी घेऊनही नोकरीच्या मागे न लागता ग्रामीण भागात चहाची टपरी टाकण्याचे धाडस केले. अन आज पंचक्रोशीत 'इंजिनीअर रुपालीचा चहा' म्हणून नावारूपास आली आहे. २०१५ मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय चांगला चालू लागला असून नाशकातही तिने माऊली चहाच्या शाखा सुरु केल्या आहेत. यातून चांगले उत्पन्न मिळत असून, नोकरीपेक्षा चहाने तिला खऱ्या अर्थाने 'सबला' बनविले आहे.

शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब शिंदे यांची मुलगी रुपाली एक चुणचुणीत आणि अभ्यासातही हुशार आहे. रुपालीने सिन्नरच्या सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूटमधून तिने केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुपालीला नोकरीसाठी वणवण करावी लागली. त्याप्रमाणे तिने एक वर्ष एका कंपनीत नोकरी केली. काही दिवस पर्याय म्हणून ब्युटीपार्लर चालवले.

परंतु ग्रामीण भाग असल्याने त्यात तिला अपेक्षित यश मिळाले नाही. काहीतरी व्यवसाय करायचाच या ध्येयाने पछाडलेल्या वेगळाच निर्णय घेतला. यासाठी रुपालीने व्यवसाय निवडला तो म्हणजे ‘चहाचा’. परंतु यासाठी तीच्या घरच्यांकडून विरोध होऊ लागला. एक मुलगी काय व्यवसाय करणार, अशी शेरेबाजी सहन करावी लागली. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत रुपालीने अखेर सायखेडा येथे माऊली चहा नावाने दुकान सुरु केले.

मात्र, तिने नेहमीच्या चहा पेक्षा वेगळ देण्याचा प्रयत्न केला. अन त्यात ती यशस्वी झाली. प्रारंभी सुरु केलेल्या तंदूर चहाला ग्राहकांनी पसंती दिली. मग आत्मविश्वासाच्या बळावर तिने बासुंदी चहा सुरू केला. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशांसाठी इतरांनी अतिरिक्त पैसे देऊन त्यांना 'माणुसकीचा चहा' देण्याचीही संकल्पना तिने राबवली. जिद्द, श्रम आणि अंगी चिकाटी असली की यश सदैव झुकतेच. हाच आदर्श निफाड तालुक्यातील सायखेडा गावाच्या रूपाली शिंदे हिने समाजासमोर ठेवला आहे.

नोकरीऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा म्हणून चहाची टपरी सुरू केली. ग्राहकांना विविध चवीचे चहा दिले. ते त्यांच्या पसंतीला उतरले. आता नाशिकमध्येही शाखा सुरू केली असून, आणखी विस्तार करणार आहे.

- रुपाली शिंदे, केमिकल इंजिनिअर चहा विक्रेती