२८ लाखांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी

२८ लाखांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काल नाशिक शहरात २८ लाख ८० हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास विभागातील (Public Works Tribal Development Department) कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला एसीबीने (ACB) बेड्या ठोकल्या...

या अभियंत्यास आज न्यायालयात (Court) हजर केले असता त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता असल्याने एसीबीने (ACB) त्याला अधिक चौकशीसाठी बागुलचा रिमांड मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने बागुलला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२८ लाखांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी
नाशकात 'मोठा मासा' एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

आर के इन्फ्रा. कॉन्स्ट्रो प्रा. ली. या फर्मचे नाशिक जिल्ह्यातील हरसुल येथील मुला-मुलींचे वस्तीगृहातील सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी लागणारा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात कामाच्या एकूण रकमेच्या १२ टक्के रक्कम २८ लाख ८० हजार रुपये लाचेची मागणी दिनेश कुमार बुधा बागुल यांनी केली होती.

२८ लाखांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी
नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी 'संक्रांत'; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

तब्बल आठवडाभर सापळा रचत बागुल याला तक्रारदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेतांना काल अटक (Arrested) करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com