उद्यापासून नाशकात 'एन्ड्युरन्स प्रीमियर लीग'

उद्यापासून नाशकात 'एन्ड्युरन्स प्रीमियर लीग'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद (Zilla Parishad), काऊंटी रेंच, हॉर्स रायडर्स नेट - लोणावळा व्हेन्यू पार्टनर ग्रेप काऊंटी रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "एन्ड्युरन्स प्रीमियर लीग २०२२' चे आयोजन शुक्रवार दि. २४ जून ते २६ जून या दरम्यान रोप काऊंटी रिसॉर्ट, त्र्यंबक रोड येथे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे (Dr. Arjun Gunde) आणि काऊंटी रॅच स्टड फार्म नाशिकचे संस्थापक समीर खान (Samir Khan) यांनी पत्रकार परिषदेत दिली...

क्रीडा (Sports) क्षेत्रात घोड्याचा (Horse) मोठ्या प्रमाणात सहभाग नेहमी पाहायला मिळतो. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये (Nashik) एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे."एन्ड्युरन्स प्रीमियर लीग" (Endurance Premier League) ही संपूर्ण भारतभरात प्रथमच सादर होत असलेला अतिशय अनोखी स्पर्धा आहे.

शुक्रवारी (दि.२४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अश्वांचे आगमन व नोंदणी, शनिवारी (दि.२५) सकाळी ९ ते दुपारी १२ अश्वांची शर्यतीपूर्वीची आरोग्य तपासणी, दुपारी ३ पासून पुढे स्पर्धेची माहिती व मार्गाचे अवलोकन व उदघाटन सोहळा. रविवारी (दि.२६) सकाळी ६ ते १० एन्ड्युरन्स प्रीमियर लीग सुरवात, दुपारी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप

एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचा मार्ग २२ किलोमीटर इतका असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील "द तेवीस कप या स्पर्धेच्या धर्तीवर याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी ४० ते ५० स्पर्धकांचा समावेश असणारे एकूण ८ संघ हे संपूर्ण देशभरातून या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहेत.

आयोजकांनी एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचे सूक्ष्म नियोजन करतांना नियमांच्या माध्यमातून स्पर्धकांबरोबरच सहभागी होणाऱ्या अश्वांच्या सुदृढतेची व आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. यामुळे या क्रीडाप्रकाराचा जास्तीत जास्त आनंद सर्वांना मिळेलच पण त्याचबरोबर भूतदयेचे देखील अनोखे उदाहरण सर्वांसमोर प्रकट होईल. अश्वाचा आणि त्यावर स्वार असणाऱ्या अश्वरोहकाचा आपसांतील कौतुकास्पद समन्वय यानिमिताने बघायला मिळणार आहे.

दरवेळी अनोख्या उपक्रमांनी आपले वेगळेपण सिद्ध करणारे नाशिक शहर, या एन्ड्युरन्स प्रीमियर लीगच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात चर्चेत आले आहे.

अश्वाचे महत्व लोकांना कळावे

"अश्वाचे महत्व लोकांना कळावे, हा क्रीडा प्रकार लोकांना माहित व्हावा व लोकसहभागातून याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत या माध्यमातून लहान मुलांना देखील या क्रीडा प्रकारची गोडी लागेल याची आम्हाला खात्री आहे"

- डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

पुढील वर्षीही आयोजन

या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता पुढील वर्षी देखील याहून मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत."

- समीर खान, संस्थापक, काऊंटी रॅच स्टड फार्म, नाशिक,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com