
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु दिवसेंदिवस शासनाच्या वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे (Encroachments) होत आहे.
अतिक्रमणामुळे पशुपालकांची पशु चराई ची समस्या गंभीर बनल्याीच तक्रार आज पशु पालकांंनी केंद्रीय पशुसंवर्धन (Central Animal Husbandry), मत्स्य आणि दुग्ध विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Fisheries and Dairy Development Minister Purushottam Rupala) यांच्या कडे केली.
बापु शिंंदे व सहकार्यांनी दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, शासनाच्या जमिनीची अवैध खरेदी विक्री (Illegal purchase and sale of land) होत असल्याने पशुपालकांना त्यांच्या कडील पाळीव जनावरांना चारापाणीची गंभीर समस्याला तोंड द्यावे लागत आहे, वनविभाग (Forest Department) आणि पशुपालक यांच्यात सतत संघर्ष होत आहे.
केंद्र शासनाच्या वनविभाने राज्यशासनाच्या महसूल विभागाकडे (Department of Revenue) दिलेल्या जमिनींचा सर्व्हे करुन ज्या जमिनीवर अतिक्रमणे , बेकायदेशीर खरेदी विक्री झाली असेल अशा जमिनी शासनाने परत घ्याव्यात.यावेळी दुग्ध व्यवसाय करणार्या विविध समाजाच्या लोकांनी समस्यांचे निवेदन दिले. लवकरच या विषयी मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री रूपाला यांनी दिले.