अतिक्रमण विभाग, गस्ती पथक सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश

अतिक्रमण विभाग, गस्ती पथक सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अतिक्रमण विभागाच्या Encroachment Department, अनागोंदी कारभारावरून स्थायी समितीच्या सभेत अतिक्रमण विभागाच्या गस्ती पथकासह सेवकांच्या बदल्या Transfer करण्याचे आदेश सभापती गणेश गीते यांनी दिले.

यावेळी सुधाकर बडगुजर यांनी 295 च्या शासन चौकशीचे काय झाले आजवर का झाली नाही, चौकशी असा प्रश्नांचा भडीमार करत अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना धारेवर धरले. प्रभाग क्रं. 29 मधील पाण्याच्या टाकीची निविदा झाल्यानंतरही वर्क ऑर्डर दिलेली नसल्याने यावर पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी आठ दिवसांत फाईल मार्गी लावण्याचे आश्वासन सभेला दिले.

मोरवाडी येथील स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचा विषय सभेच्या मंजुरीसाठी आला यावेळी राहुल दिवे यांनी अमृतधाम येथील स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या चार महिन्यांपासुन निविदा झाल्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर अद्याप काम सुरू झालेले नाही. योगेश हिरे यांनी आकाशवाणी भाजी बाजार येथील अतिक्रमणचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांना कार्यवाही बद्दल जाब विचारला असता सदस्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

यामुळे हिमगौरी आडके यांनी भाजी बाजारात खालील बाजूला स्वच्छतागृह नाही आणि वरच्या मजल्यावरील स्वच्छता गृहाला कुलूप लावले जाते. त्यामुळे वरचे सभागृह आणि स्वच्छतागृह नेमके कोणाच्या मालकीचे आहे. या जागेच्या सात बार्‍यावर महापालिकेचे नाव लागलेले आहे की नाही याचा ही नगररचना विभागाने करावा . त्याच बरोबर आकाशवाणी भाजी बाजारात बसत असलेल्या अनधिकृत भाजीवाल्यांमुळे येथील वाहतुकीस मोठा अडथळा होत असल्याने परिसरातले नागरिक त्रस्त आहेत. तरीही अतिक्रमण विभाग धडक कारवाई करत नाही.

अतिक्रमण कर्मचार्‍यांचे येथील भाजी विक्रेत्यांसोबत लागे बांधे असल्याचा आरोप योगेश हिरे यांनी केला. यावर सभापती गीते यांनी भाजी बाजारात 15 दिवसांकरिता पथक नेमण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले. मात्र चौकशी झालेली नसल्याने खाडे निरुत्तर झाले होते. यावेळी मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, रत्नमाला राणे आदी सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com