नांदगावात अतिक्रमण मोहीम; मटण मार्केट हटविणार
नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon
सप्टेंबर 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे (heavy rain) नांदगाव (nandgaon) शहरातील शाकंभरी व लेंडी नदीला महापूर आला होता. त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
त्याचा ठपका शहरातील वाढलेले अतिक्रमण (Encroachment) व रेल्वेच्या भुयारी मार्गात अडथळा ठरणारे मटण मार्केटवर (Meat market) ठेवण्यात आला होता. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने मटण मार्केट व अतिक्रमण मंगळवारी (दि.17) काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे (Chief Officer and Administrator Vivek Dhande) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
येथील नगरपालिकेच्या मटण मार्केटमधील गाळेधारकांनी मटण मार्केट स्थलांतरास विरोध केला होता. या मार्केट जवळून रेल्वेचा भुयारी मार्ग गेलेला आहे. याबाबत रेल्वेने मार्केट खाली करून देण्यासंदर्भात नगरपालिकेला (Municipality) कळविले होते. त्याविरोधात मटण मार्केटमधील गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित गाळे खाली करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
दरम्यान सप्टेंबर 2021 उदभवलेल्या महापूराच्या (Flood) पार्श्वभूमीवर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व भुसावळ रेल्वे विभाग (Railway Department) अधिकार्यांच्या तांत्रिक निरीक्षण अहवालानुसार मटण मार्केट वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे सांगितले होते. मटण मार्केट हे लेंडी नदीच्या पूरस्थितीला व रेल्वे भुयारी मार्गाच्या वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांनी तांत्रिक निरिक्षण अहवालात म्हटले आहे.
मटण मार्केटमधून अंडरपासचा दुसरा पर्यायी रस्ता रेल्वे विभाग तयार करून देणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 17) मटण मार्केट तसेच इतर अतिक्रमणांसह गांधी चौक फरशीवरील अतिक्रमण हटविण्यात येणार असून नागरिकांनी आपली दुकाने, टपर्या हटवून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्यधिकारी धांडे यांनी केले आहे.