दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या : कनोज

दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या :  कनोज

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

‘ दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रोत्साहन द्यावे ’, असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले.

समावेशीत शिक्षण पंचायत समिती दिंडोरी, सोशल नेटवर्किंग फोरम,शालेय पोषण आहार विभागाच्या संयुक्त विद्यमाने गट साधन केंद्र दिंडोरी पंचायत समितीमध्ये दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना भास्कर कनोज बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर शालेय पोषण आहार अधिक्षक रुपाली पगार,सोशल नेटवर्किंग फोरमचे दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड, समावेशीत विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

चित्रकला:- लहान गट- प्रथम क्रमांक अथर वाघ, विश्वनाथ वाघ, व्दितीय क्रमांक - ओमकार कोकाटे, तृतीय क्रमांक- संचिता ज्ञानेश्वर झनकर, चित्रकला :- मोठा गट- प्रथम क्रमांक - गौरी संतोष डंबाळे, व्दितीय क्रमांक- करण रमेश बेंडकुळे, तृतीय क्रमांक- प्रकाश सुनील वाघ,

वेशभुषा:- लहान गट- प्रथम क्रमांक - साक्षी सचिन देशमुख, व्दितीय क्रमांक - ओमकार गणेश जाधव, तृतीय क्रमांक- सार्थक गुलाब ढगे, वेशभुषा :- मोठा गट- प्रथम क्रमांक - ओमकार प्रकाश पाटील, व्दितीय क्रमांक- तन्मय कैलास गवारी, तृतीय क्रमांक - समीक्षा कैलास गांगुर्डे,

गायन स्पर्धा:- प्रथम क्रमांक तेजस्विनी संजय चौधरी, व्दितीय क्रमांक - रिमझिम राकेश पवार, तृतीय क्रमांक मयुर राजेंद्र आहेर आदींनी यश संपादन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com