
ओझे | विलास ढाकणे | Oze
राज्यातील जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) कार्यरत पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या मागणी व पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टी कालावधीत व्यतीत कराव्या लागणाऱ्या कर्तव्य कालावधीची भरपाई म्हणून दरवर्षी 15 विशेष अर्जित रजा मंजूर केली आहे...
ती नियमित मिळणाऱ्या 10 दिवस रजेव्यतिरिक्त असेल. मुख्याध्यापक पदावर हजर झाल्यापासूनच्या संचित अर्जित रजेचे सेवा निवृत्ती समयी शिल्लक रजेचे रोखीकरण करून रक्कम देण्याबाबत शासन आदेश पारित करण्यात आला आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे अभ्यासू राज्याध्यक्ष सऺभाजीराव पाटील, राज्य सरचिटणीस भाऊसाहेब निकम, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी. सरचिटणीस लालसिंग ठोके, कोषाध्यक्ष निंबा दातरे, महिला प्रतिनिधी सुनंदा जाधव यांनी परिश्रम घेतले.
जि. प. पात्र मुख्याध्यापक यांना अर्जित रजेचे रोखीकरण ही मागणी अनेक दिवसांपासून होती. ती मान्य झाल्याने अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ संघटनेचा खऱ्या अर्थाने विजय झाला असून सर्व पात्र मुख्याध्यापक आनंदोत्सव साजरा करतील.
- प्रकाश गोसावी, मुख्याध्यापक महासंघ, जिल्हाध्यक्ष.