
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने (Prahar Janashakti Paksha) तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीस (Pangri Gram Panchayat) रिकाम्या घागरी भेट देऊन टँकरने (Tanker) मुबलक पाणी (water) देण्याची मागणी करण्यात आली. तात्काळ अंबलबजावणी न केल्यास आमरण उपोषणाचा (hunger strike) इशारा तालुकाध्यक्ष शरद शिंदे यानी यावेळी दिला.
गेल्या काही दिवसांपासून पांगरी परिसरात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी (drinking water) मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. गावाचा पाणी पुरवठा योजनेत (Water supply scheme) सहभाग असून देखील नागरिकांना प्यायला पाणी मिळत नाही. पांगरी व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (drinking water issue) गंभीर बनत चालला असून ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी (water tax), घरपट्टी (house tax) आकारण्याचे काम सुरुच आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायत कुठलीही उपाययोजना करताना दिसून येत नाही.
पांगरीसह तालुक्यातील वावी, शहा, हरसुले, देवपुर, वल्लेवाडी, घोटेवाडी, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, डुबेरे, मनेगाव, सोनांबे, वडगाव, धारणगाव, पाटोळे, खापराळे, जयप्रकाश नगर, वडगाव, दोडी, गोंदे या गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असून तेथे तत्काळ टंँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
यावेळी उपाध्यक्ष सुनील महाराज जगताप, शहराध्यक्ष अमित शिंदे, रमेश लाड भाजीपाला संघटना अध्यक्ष, संदिप लोंढे युवाध्यक्ष, निलेश चव्हाण उपशहराध्यक्ष, दिपक पगार, प्रकाश पांगरकर, संतु पगार, बाळु पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.