नाशिक । Nashik

सुरगाणा तालुक्यातील कहांडोळ पाडा येथील ३० ते ३५ महिलांना माणदेशी फाउंडेशन तर्फे मशरूम प्रशिक्षण देण्यात आले. मशरूम व्यवसाय सुरु करण्यास प्रात्यक्षिक करून मशरूम बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात माणदेशी फाऊंडेशन ने पुढाकार घेतला असून मार्गदर्शक म्हणून महिला पुढे येत आहेत. त्यासाठी नोकरी व्यवसाय सांभाळून महिलांना व्यावसायिक शिक्षण देत आहे.

माणदेशी फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर म्हणून सुनंदा भुसारे पेठ तालुक्यातील महिलांना रोजगार प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी पेठ तालुक्यातील आड बु., आसरबारी, गायधोंड, झरी, सावर्ना, बेहडापाडा इ. गावातील महिलांना शेळीपालन, कुकूटपालन, मशरूम उद्योग असे अनेक छोटया छोटया उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिलांना व्यावसायिक बनवले आहे.

पेठ तालुक्यातील आड बु. गावातील नऊशे पेक्षा अधिक महिलांना मशरूम व्यवसाय प्रशिक्षण देऊन बियाणे वाटप केले. एक ते दीड हजार रुपये गुंतवणूक करून महिलांनी दहा हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे घर सांभाळून आपण सुद्धा व्यवसायातून पैसे कमवू शकतो, विश्वास त्यांना आलेला आहे.

आम्हा महिलांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने रोजगार उपलब्ध होईल. घर खर्चाला हातभार लागेल. पुढील महिन्यात शेपुझरी यात्रा येईल, त्यावेळी नागलीची भाकरी व भुजा, कुलद्या यात्रेकरूंना उपलब्ध करून देणार आहोत.

- जनाबाई हिरामण वार्डे, कहांडोळपाडा