
नाशिक | Nashik
शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये (Hotel) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने (Employees)आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल करंडे (२९) (Atul Karande) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा (Satara) येथील रहिवासी होता. त्याने सोमवार (दि.०२) रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली.
यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी तात्काळ पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik civil Hospital) दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला होता.
दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरु आहे. तसेच आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.