100 टक्के लसीकरणासाठी भर द्याः आ.पवार

100 टक्के लसीकरणासाठी भर द्याः आ.पवार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

‘ओमायक्रोनच्या (omicron) नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील (kalwan taluka) आरोग्य यंत्रणेने (Health systems) सजग राहणे गरजेचे आहे.

जनजागृतीवर अधिक भर देत नागरिकांनी मास्कचा (mask) वापर कायम करावा, मास्क वापर न करणार्‍यावर दंडात्मक कारवाईसह (Punitive action) कळवण तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात (Government and semi-government offices) तसेच खासगी आस्थापनात ‘नो मास्क नो एन्ट्री’ (No mask no entry) बंधनकारक करा, कोविड काळात शासकीय यंत्रणेने मुख्यालयी रहावे’, असे आवाहन आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांनी केले.

कळवण (kalwan) पंचायत समिती (Panchayat Samiti) सभागृहात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आढावा बैठकीचे (Taluka review meeting) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पवार बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार (Former President of Zilla Parishad Jayashree Pawar), जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, तहसीलदार बी. ए. कापसे, संतोष देशमुख, हेमंत पाटील, ज्ञानदेव पवार, लालाजी जाधव आदी मान्यवर होते.

तालुका आढावा बैठकीत विविध खात्याचे विभागप्रमुख उपस्थित नसल्याने प्रारंभी आमदार नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त करीत तहसीलदार बी. ए. कापसे यांना कारणे दाखवा देण्याची सूचना केली. पुढील बैठकीस गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमिवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत तालुक्यात लसीकरण पूर्ण करण्यावर आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेचा अधिक भर द्यावा, लसीकरणाचा (vaccination) दुसरा डोस घेण्याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येत असल्यामुळे तातडीने उपाययोजना करुन 100 टक्के लसीकरण करा असे निर्देश आमदार नितीन पवार यांनी शासकीय यंत्रणेला दिले.

15 ते 18 वयोगटातील लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत करुन कळवण उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे कोविड सेंटर (Covid Center) सुरु केले तर करोना रुग्ण व्यतिरीक्त रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचा असा सवाल आमदार पवार यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी जयदर व नांदुरी येथील वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी नोंदवली. तालुक्यातील उपकेंद्राना कुलूप आढळून येते

वैद्यकीय अधिकारी यांच्या ड्युट्या मॅनेज होत असल्यामुळे कोणी वैद्यकीय अधिकारी सापडत नसल्याने महिलांच्या प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) होत नसल्याने त्या महिलांना नाशिक (nashik) व कळवणला (kalwan) पाठवले जात असल्याची तक्रार बैठकीत केली. आरोग्य यंत्रणेची माहिती देतांना तालुका वैद्यकीय अधिकारी गोंधळून गेले तर कळवण उपजिल्हा रुग्णालयात कोविडसाठी 7 वैद्यकीय अधिकार्‍यांचे पॅनल तयार केले असून उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 50 बेडचे विलगीकरण कक्ष सुरु करणे गरजेचे आहे.

15 जानेवारी नंतर कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनी बैठकीत व्यक्त करुन कामकाजाची माहिती दिली. कळवण तालुक्यात वीज तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्याची गरज असून नवीबेज परिसरात 1973 पासून वीज तारा बदलल्या नाही जीर्ण झाल्या आहेत त्या बदलून देण्याची मागणी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी बैठकीत केली. यावेळी महसूल, पंचायत समिती (panchayat samiti), शिक्षण (education), आरोग्य (Health), महावितरण(MSEDCL), कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जिल्हा परिषद इवद, बांधकाम, लघुपाटबंधारे आदी विविध विभागाचा खातेनिहाय आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील विविध खात्याचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com