त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून सुरक्षा व्यवस्थेवर भर

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून सुरक्षा व्यवस्थेवर भर

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने (Trimbakeshwar Temple Trust) सुरक्षा व्यवस्थेवर भर देत मंदिर परिसरात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची (Maharashtra Security Force) नेमणूक करण्यात आली आहे...

त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू भाविकांची गर्दी वाढत आहे. गर्दीत नियोजन कोलमडू नये, शिस्त टिकून राहावी याकरिता महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (M. S.F) येथे तैनात करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ करावी 35 गार्ड पोलीस (Police) नेमण्यात आले आहे. यात 8 11 लेडीज, 16 पुरुष असे गार्ड आहेत. दर सोमवारी त्र्यंबकेश्वराची पालखी मिरवली जाते. त्रंबकेश्वरमध्ये श्रावण (Shravan) महिना महाशिवरात्र पर्वकाळात सुट्ट्यांच्या काळात सुरक्षेची गरज भासते. प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वरचा सुवर्ण मुकुट काही मिनिटांसाठी भाविकांना पाहायला मुभा असते. वरील नियुक्तीमुळे सोमवारचे पालखीचे नियोजन सुलभ झाले आहे.

दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये अधिक कायमस्वरूपी जादा पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी जनेतेने केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानची वाटचाल अधिक स्वयंपूर्णतेकडे सुरू आहे. पूर्व दरवाजा दर्शन बारीचे काम प्रगतीवर आहे. ट्रस्ट ऑफिसकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्रंबकेश्वर मंदिरचा कारभार श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून ट्रस्टचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी (Vikas Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीवर सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com