आरोग्य, शिक्षण तरतूदीवर भर द्याः गावित

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

आदिवासी विकास विभागाकडून (Tribal Development Department) कोट्यवधींचा निधी (fund) आदिवासी भागाच्या (tribal area) विकासासाठी दरवर्षी दिला जातो.

पण त्या निधीचा उपयोग सभामंडप, भूमिगत गटारीसारखी (Underground sewers) कामे करण्यावर केला जातो. आदिवासी विकास विभागाने शिक्षण (education), आरोग्य विभागाच्या (Department of Health) तरतुदींवर भर द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गावित (Social activist Sadashiv Gavit) यांनी केली आहे.

गेल्या पाच वर्षांत भूमिगत गटारीसारखी कामे झालेल्या सर्व गावांचा अहवाल आदिवासी विकास विभागाने (Tribal Development Department) पडताळणी करावी व निर्णय घ्यावा असे मत व्यक्त करत आदिवासी विकास विभागाने ठक्कर बाप्पा आदिवासी उपयोजनेंचा किमान 50% निधी शिक्षण (education) व आरोग्य विभागाकडे (Department of Health) वळवून आदिवासी जनतेंचा खरा विकास करावा अशी मागणी गावित यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात (nashik district) दोन आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत असून या दोन्ही प्रकल्पात ठक्करबाप्पा आदिवासी उपयोजना सुरु आहेत. ठक्करबाप्पा आदिवासी उपयोजनेमार्फत ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर आधारीत निधी वितरित केला जातो. दर तीन वर्षांनी प्रत्येक आदिवासी ग्रामपंचायतीला किंवा ग्रुप ग्रामपंचायत असेल तर महसुली गावाला सरासरी 15 लाख ते 30 लाख एवढा निधी विकास निधी दिला जातो.

आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार हा निधी (fund) सभामंडप बांधकाम करणे, भूमिगत गटार बांधकाम करणे तसेच इतर मुलभूत सुविधांवर खर्च करणे आदींसाठी वापरता येतो. तसे पहाता आजही आदिवासी भागातील प्राथमिक शाळा (Primary school), आरोग्य उपकेंद्रे त्यांना दिल्या जाणार्‍या सुविधा तुटपुंज्या आहेत. प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे (zilha parishad) शिक्षण विभागाला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात खुप अडचणींचा सामना करावा लागतो. जर आदिवासी विकास विभागाने ठक्कर बाप्पा आदिवासी उपयोजनेंचा किमान 50% निधी शिक्षण व आरोग्य विभागाकडे वळता केला तर आदिवासी गावातील सर्वच शाळा व आरोग्य व्यवस्था सुरळीत होतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गावित यांनी व्यक्त केला. आदिवासींच्या निधींचा गैरवापर थांबवावा अशी मागणी गावित यांनी संबंधित विभागाला केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com