करोना नियंत्रणात ठेवत विकासावर भर - पालकमंत्री भुजबळ

येवला तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन
करोना नियंत्रणात ठेवत विकासावर भर - पालकमंत्री भुजबळ

येवला । प्रतिनिधी Yeola

करोना corona वाढला तर विकासकामांचा वेग कमी होतो. त्यामुळे करोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांनी करोना व लसीकरणाकडे corona vaccination दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी केले.

येवला तालुक्यातील न्याहारखेडे, नगरसूल व मातुलठाण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन Bhumipujan of various development works पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, न्याहारखेडेच्या सरपंच कमलाबाई मोरे, नगरसूलच्या सरपंच मंदाकिनी पाटील, प्रकाश वाघ, तहसीलदार प्रमोद हिले, सहाय्यक अभियंता सागर चौधरी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, करोनाच्या कालावधीत मागे पडलेली विकासकामे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे अर्थचक्रासोबतच विकासकामांना गती प्राप्त होत असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले असून यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. या प्रकल्पातून पाणी येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

विकासकामे

न्याहारखेडे येथील दिघवत-पाटोदा-सावरगाव-नगरसूल-वाईबोथी- भारम रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 68 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, नगरसूल येथील प्रमुख जिल्हा मार्ग 79 येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे ते प्रमुख जिल्हा मार्ग 70 व 162 मध्ये रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण,

प्रमुख जिल्हा मार्ग 79 मध्ये येवला-गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे ते प्रमुख जिल्हा मार्ग 70 व 162 रस्त्याची सुधारणा करणे, हडपसावरगांव जायदरे ते प्रजिमा 70, प्रजिमा 162 कि.मी. रस्त्याची सुधारणा करणे, उंदीरवाडी-कोटमगाव-नगरसूल-कोळगाव-ममदापूर 76 रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 160 कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे आणि मातुलठाण येथील मातुलठाण-धामणगाव- अंदरसूल ते प्रमुख जिल्हा मार्ग 80 व 162 मध्ये रस्ता रंदीरकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,

अनकुटे-धामोडे रामा 25 ते मातुलठाण-सायगाव-अंगुलगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग 78 मध्ये रस्त्याचे रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com