काय सांगता! होय, ४ हजार नागरिकांनी केले Remdesivir इंजेक्शनसाठी Email

काय सांगता! होय, ४ हजार नागरिकांनी केले Remdesivir इंजेक्शनसाठी Email

नियंत्रण कक्षावर ताण : रुग्णालयांनी मागणी नोंदवावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून रुग्णालयांनी मेलद्वारे आँनलाईन फार्म भरुन मागणी नोंदवल्यावर त्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात आहे.

मात्र, रुग्णाचा नातेवाईकांकडून परस्पर हा आँनलाईन फार्म भरुन इंजेक्शनची मागणी केली जात असून त्यासाठी चार हजार व्यक्तिगत मेल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहे.

या प्रकरामुळे नियंत्रण कक्षाचा वेळ वाया जात असून व्यक्तिगत इमेल करणार्‍यांना इंजेक्शन मिळणार नाही,असे जिल्हाप्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यापुर्वी रुग्णांचे नातेवाईक रेमडिसिव्हर इंजेक्शन विक्रेते वितरकांकडून हे अौषध विकत घेत होते. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हरचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले. बाराशे रुपयांचे इंजेक्शन दहा ते वीस हजाराला विकले जात होते.

साठेबाजीमुळे रेमडिसिव्हरचा तुटवडा निर्माण झाला व इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि वितरणावर व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली.

तसेच थेट मेडिकलमध्ये आता रेमडिसिव्हर मिळणार नसून त्यासाठी रुग्णालयांना एक आँनलाईन फार्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांची मागणि या फार्ममध्ये भरुन तसा इमेल नियंत्रण कक्षाला पाठवायचा. कक्षाकडून थेट रुग्णालयाला हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात आहे.

य‍ा नवीन प्रणालीनूसार जिल्ह्यातल्या १०१ रुग्णालयांना ४ हजार १५३ इंजेक्शनचे वितरण केले आहे. शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या सर्व रुग्णांना इंजेक्शन देण्यात आले. मात्र, काही रुग्णांचे नातेवाईक परस्पररित्या इंजेकंशन मागणीचा हा आॅनलाईन फार्म भरुन मेल जिल्हा नियंत्रण कक्षाला पाठवत आहे.

रेमडिसिव्हरची मागणी करणारे तब्बल चार हजार मेल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले. त्यामुळे नियंत्रण कक्षाच्या कामात अडथळे निर्माण होत अाहे. परस्पर असा मेल न करण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

रेमीडीसिव्हर मागणीसाठी दिलेला इमेल केवळ रुग्णालयासाठी आहे. त्यावर खासगी व्यक्तींनी जवळपास चार हजार इमेल व्यक्तिगत मागणीचे केले आहेत. हे अपेक्षित नाही. त्यामुळे कक्षाचा वेळ जात आहे. रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी असे करु नये. व्यक्तिगत इमेल करणार्‍यांना औषध मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com