दिंडोरी । प्रतिनिधी

सध्या वीज कंपनीने शेतकर्यांना शेतीपंपाचे बिले दिले असून या बिलांची रक्कम मोठ्या प्रमाणात आल्याने शेतकर्यांना धक्का बसला आहे. वीजपंपाचा वापर व आलेले बिल यांच्यात तफावत असल्याने ही तफावत दूर करून शेतकर्यांना योग्य त्याच बिलांची आकारणी करावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

शेतीसाठी देण्यात आलेल्या वीजजोडणीनुसार बिले येणे अपेक्षित होते. परंतु महावितरण गलथानपणा उघड करून अनेक शेतकर्यांकडे 3 एचपी शेतीपंप असून, 3 एचपीनेच कोटेशन भरलेले असताना वीजबिल पाच एचपीचे बिल तर पाच एचपी शेती पंपावाल्यांना साडेसात एचपीची बिले येत आहे.

याबाबत दिंडोरी येथील शेतकर्यांनी रामदास चारोस्कर यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले. त्यानंतर चारोस्कर यांनी वीज कंपनीचे उपअभियंता राऊत व बोरकर यांच्याशी चर्चा केली.