अकरावी प्रवेश : साठ महाविद्यालयांचा समावेश
नाशिक

अकरावी प्रवेश : साठ महाविद्यालयांचा समावेश

आजपासून भाग एक भरण्यास संधी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.या प्रक्रियेद्वारे नोंदणी करणार्‍या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि.२६) पासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर पूर्ण करावी लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत एका महाविद्यालयाची भर पडली आहे. या महाविद्यालयातील वाढलेल्या जागांसह नाशिक शहरात एकूण २५ हजार ३० जागा अकरावी प्रवेशासासाठी उपलब्ध झाल्या असून यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कला शाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १३६० जागांचा समावेश आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, अकरावी प्रवेश अर्जाचा भाग भाग एक भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २६ जुलैपासून सुरू होईल, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ अर्थात महाविद्यालयाचे पर्याय (पसंतीक्रम) निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वाढीव प्रवेश शुल्काचा भूर्दंड टाळण्यासाठी अनुदानित महाविद्यालयांमधील जागांचा पर्याय निवडण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे

Deshdoot
www.deshdoot.com