नाशिक जिल्ह्यात पावणे अकरा लाख नागरीकांचे लसीकरण

दिवसभरात 122 केंद्रांवर 10 हजार 620 जणांना डोस
नाशिक जिल्ह्यात पावणे अकरा लाख नागरीकांचे लसीकरण

नाशिक। प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात आज दिवसभरात 122 केंद्रांवर दोन्ही मिळून 10 हजार 620 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 10 लाख 73 हजार 565 नागरीकांना लस देण्यात आली आहे...

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. आठडाभरात सरासरी 13 ते 15 हजार लसी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत आहेत. दरम्यान सोमवारी दिवसभरात दोन्ही मिळून 10 हजार 620 जणांना लस देण्यात आली आहे.

16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दिड महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या 8 तर जिल्हाभरातील 103 व मालेगाव 11 अशा एकुण 122 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात 9 हजार 428 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 1 हजार 191 ग्रामिण जिल्ह्यात 7 हजार 568, मालेगाव 669 असे लसीकरण झाले आहे. तर 1 हजार 192 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com