प्रवेश अर्जच येईना ! आरटीईच्या अद्यापही 'इतक्या' जागा रिक्त

प्रवेश अर्जच येईना ! आरटीईच्या अद्यापही 'इतक्या' जागा रिक्त

नाशिक । Nashik

आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत (RTE Admissions) आतापर्यंत ३०२३ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया (Student Admission Process) पूर्ण झाली आहे. सोडतीद्वारे (Lucky Draw) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. २३) पर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रवेशासाठी ही अंतिम मुदत (Last Date) आहे. आरटीइद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. 1185 विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे.

आरटीई प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांत तीन हजार तेवीस विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (Education Act) खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश (Student Free Admission) दिला जातो. शहर व जिल्ह्यातील 450 शाळांमध्ये 4544 जागा उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर झाली असून त्यात 4208 विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रवेशासाठी सोडत जाहीर झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना फेरीनिहाय प्रवेश दिला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीमध्ये संधी मिळाली आहे, त्यांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल.

1185 जागा अजूनही रिक्त :

आरटीई प्रवेशासाठी शेवटचा दिवस राहिला असताना अजूनही 1185 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा निर्णय राज्यस्तरावरून घेतला जाणार असल्याने सध्यातरी शेवटच्या दिवसांत पालकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

असे झाले प्रवेश

450 : शाळा

4544: प्रवेशाच्या जागा

13333: प्रवेशअर्जांची संख्या

4208: निवड झालेले विद्यार्थी

3023: प्रवेश झालेले विद्यार्थी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com