त्र्यंबक तालुक्यात विजेचा लंपडाव; 'ही' गावे अंधारात

त्र्यंबक तालुक्यात विजेचा लंपडाव; 'ही' गावे अंधारात

नाशिक | Nashik

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस (Rain) आणि वाऱ्यामुळे (wind) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) काही गावांत गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा (Electricity) लंपडाव सुरु आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर विजेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे...

त्र्यंबक तालुक्यातील वाघेरा (Waghera) वरसविहीर (Varasveheer) नांदगाव कोहळी (Nandgaon Kohli) गोरठाण (Gorthan) गणेशगाव (Ganeshgaon) वेळुंजे (Velunje) अंबोली (Amboli) तोरंगण (Torangan) मेटकावरा (Metkawara) हेदपाडा (Hedupada) हेदुलीपाडा (Hedulipada) या परीसरात (Area) गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. या गावांत दिवसातून दोन ते चार तास सुद्धा लाईट टिकत नाही. तसेच कधी आठ ते दहा दिवस लाईट बंद असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस येथील ग्रामस्थांना जनावरांची कामे करतांना अडचणी येत असतात.

तसेच या गावांमधील विजेचे खांब (Electric poles) हे बरेच जुने असल्याने ते जीर्ण झालेले आहेत. याशिवाय काही ठिकाणी विजेच्या तारा खाली आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत महावितरणशी (Mahavitran) संपर्क साधून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदर विजेचा प्रश्न लवकर सोडवावा नाही तर मोठ्या प्रमाणत जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील लाईट बंद असून दिवसभरातून दोन तास सुद्धा लाईट टिकत नाही. तसेच या गावांमधील गावठाण भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. याशिवाय महावितरणकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने या गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी विजेची ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्याकरिता महावितरणने याकडे लक्ष द्यावे.

समाधान बोडके, स्थानिक रहिवासी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com