सुट्टीच्या दिवशीही भरता येणार वीजबिल

सुट्टीच्या दिवशीही भरता येणार वीजबिल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

ग्राहकांना वीजबिलाचा (Electricity bill) भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत...

त्यानुसार नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) महावितरणचे (MSEDCL) सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दिनांक २८ व २९ ऑगस्टला शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. वीज ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर (App) वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते.

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (Paytm, Google Pay) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड (qr code) स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते.

करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येईल व संसर्गापासून बचाव करता येईल. अखंडित वीजसेवेसाठी ऑनलाईन उपलब्ध सुविधांचा उपयोग करून वीज ग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com