ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नाशिक | NASHIK

ग्राहकांना वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी शनिवार (२१ मे) व रविवारी (२२ मे) रोजी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत...

त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील सर्व परिमंडलासह नाशिक परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. ही उपलब्ध सुविधा तसेच डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते.

याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com