आठ दिवसांपासून रोहित्र बंद

आठ दिवसांपासून रोहित्र बंद
प्रातिनिधिक

पाथरे | प्रतिनिधी Sinnar/ Pathare

पाथरे खुर्द ( Pathre Khurd )येथील पोहेगाव रस्त्यावर तसेच पोलिस चौकीच्या जवळील रोहित्र क्रमांक १८ ( Electrical Transformer )हे कायम नादुरुस्त असते. जवळपास तीन वर्षांपासून या रोहित्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.

या रोहित्रावरील पंधराच्या क्षमतेचे तिन गट्टु आहे त्या पैकी एक एक गट्टु वेगवेगळ्या कारणाने बंद पडत आहे. आता तर गेल्या आठ दिवसा पासुन सदर रोहित्र पुर्णता बंद आहे. याबाबत महावितरणच्या ( Mahavitran )कार्यलयात शेतकरी आणि ग्रामस्थांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रार केली आहे. अजूनही संबंधित आधिकारी व कर्मचारी हे सदर रोहित्राकडे फिरकले नाही. शेतकऱ्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहे.

पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नाही तसेच बहुतेक वेळेस रोहित्र बंद अवस्थेत असते. वीजपुरवठा सुरळीत नसतांनाही वीज बिल कसे येते हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी, व्यावसायिक यांना विजे अभावी मोठी झळ सोसावी लागत आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाचवताही येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

सद्या गेल्या आठ दिवसा पासुन सदर रोहित्र बंद आहे. उन्हाचा तडाखा तीव्र असताना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली आहे. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना उकड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दयावे तसेच सदर रोहित्र चालू करून पुर्ण दाबाने वीजपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांकडून होत आहे.

ग्रामस्थ त्रस्त

पाथरे आणि परिसरात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने होणे असे प्रकार सातत्याने होत आहे. रात्री अपरात्री असा प्रकार होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी केल्या आहे. ऐन कडक उन्हाळ्यात विजेची गरज असतांना वीजपुरवठा खंडित हो होण्याचा प्रकार वाढला आहे. व्यावसायिक, शेतकरी, ग्रामस्थ या प्रकाराला कंटाळून गेले आहे. व्यावसायिकांना आर्थिक तोटाही यामुळे सहन करावा लागत आहे. सदर समस्या वरिष्ठांना सुद्धा कळवली आहे. मात्र त्यावर उपाय होत नसल्याचे दिसते. लोडशेडिंग च्या व्यतिरिक्तही वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे.

Related Stories

No stories found.