महावितरणच्या ५ हजार ५७६ वितरण पेट्यांची झाकणे बंद

विद्युत सुरक्षा दिवसानिमित्त
विद्युत सुरक्षा दिवस
विद्युत सुरक्षा दिवस

नाशिक । Nashik

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर, मालेगाव आणि अहमदनगर मंडळामध्ये शून्य विद्युत अपघातासाठी (दि.१८ जुलै) रोजी विद्युत सुरक्षा जागरूकता दिवसाचे आयोजन नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता संजय खंडारे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या दिवशी परिमंडळात विद्युत यंत्रणेच्या विविध सुरक्षेच्या कार्यासह डीपी/वितरण पेटी/ मिनी पिल्लर यांची उघडी असलेली एकूण ५ हजार ५७६ झाकणे बंद व दुरुस्ती करण्याबरोबर महावितरणच्या सर्व कार्यालयामध्ये कर्मचारी यांनी सामूहिकपणे विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा घेतली.

ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज पुरवठा आणि विविध सेवा देण्याबरोबरच महावितरणकडून अविरतपणे नवीन यंत्रणेची उभारणी व अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेची निगा व दुरुस्तीची कामे होत असतात, मात्र सदर कामे करीत असतांना अपघात घडून कर्मचाऱ्यांना इजा अथवा मृत्यू होण्याचे प्रकार होत असल्याने सदर दुर्घटना टाळण्यासाठी पुढाकार घेत मुख्य अभियंता संजय खंडारे यांनी परिमंडळातील विद्युत सुरक्षिततेबाबतची जागरुकता कर्मचारी तथा ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्युत सुरक्षा दिनाचे शनिवारी आयोजन केले होते.

यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत यंत्रणा, उपकेंद्रे यामध्ये विविध कार्ये करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या डीपी/वितरण पेटी/ मिनी पिल्लर यांची उघडी असलेली झाकणे बंद तथा दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये विभागनिहाय नाशिक शहर -१ (११५), नाशिक शहर- २ (३५४), नाशिक ग्रामीण (१४८) आणि चांदवड (४७५) असे एकूण नाशिक शहर मंडळात १०९२ तर कळवण (२३१),मनमाड (४४२), मालेगाव २७० व सटाणा विभागात (१९२) असे एकूण मालेगाव मंडळात १, १३५ तसेच अहमदनगर शहर (५२२), अहमदनगर ग्रामीण (४०१), कर्जत (५६८), श्रीरामपूर (४५३) आणि संगमनेर विभागात (१४०५)

याप्रमाणे एकूण अहमदनगर मंडळात ३,३४९ तर नाशिक परिमंडळात ५हजार ५७६ ठिकाणचा समावेश आहे.

नाशिक येथे विद्युत भवन येथे सुद्धा सामूहिकपणे विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. "अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधनांचा नियमित वापर व नियमांचे जबाबदारीपुर्वक काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक कर्मचारी यांचे कर्तव्य असून शून्य अपघातासाठी सर्व ग्राहकांनी सुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता संजय खंडारे यांनी यावेळी केले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, अनिल थोरात, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचेसह अभियंते व जनमित्र उपस्थित होते. हा उपक्रम राबविण्यासाठी अधिक्षक अभियंते रमेश सानप, प्रविण दरोली आणि संतोष सांगळे यांचेसह सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते व जनमित्र यांनी सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com