नाशिक जिल्ह्यातील 'इतक्या' ग्रामपंचायतींचा उडणार धुरळा

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी राज्यामधील पहिल्या टप्पातील ७ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक (Gram Panchayat Election) पार पडली. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने (State Election Commission) जाहीर केली आहे. या निवडणुकांमुळे गावागावात धुरळा उडणार आहे....

राज्य निवडणुक आयोगाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू केली आहे. या निवडणुकीकरिता १८ डिसेंबरला मतदान (Voting) होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी (counting) होईल. दुसऱ्या टप्प्यातील ३४ जिल्ह्यातील ३४० तालुक्यांमधील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच १९४ ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये होणार निवडणूक

इगतपुरी ०२, कळवण १६, चांदवड ३५ , त्र्यंबक ०१, दिंडोरी ०६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, मालेगाव १३, येवला ०७, सिन्नर १२

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या काळात इच्छुकांना अर्ज सादर करता येणार. तर ०७ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. तसेच १८ डिसेंबरला मतदान व २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com