'इतक्या' सहकारी संस्थांच्या निवडणुका; मतदार यादी प्रसिद्ध

'इतक्या' सहकारी संस्थांच्या निवडणुका; मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर व तालुक्यातील 15 सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) निवडणुकीचा (election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या सहकारी संस्थांची प्राथमिक मतदार यादी (voter list) 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून यावर दि. ६ जानेवारीपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर 13 जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊन निवडणूक (election) कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

ज्या 15 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये पुढील संस्थांचा समावेश आहे. उत्कर्ष गृहिणी सहकारी औद्योगिक संस्था लिमिटेड, तालुका नाशिक रविकरण विद्युत मजूर व बांधकाम सहकारी संस्था मर्यादित आडगाव, तालुका नाशिक, श्रमिक सहकारी मजूर संस्था मर्यादित दाढेगाव, नाशिक, खादी ग्रामोद्योग मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक, हृदयेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रमिक नगर, सातपूर,

राजाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संसरी, श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गिरणारे, कै. शांताराम चौधरी नागरी सहकारी पतसंस्था सिडको-सातपूर, तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रविवार पेठ, गिरणा बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, जनलक्ष्मी सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, दि न्यू इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिक, सहकारी दूध योजना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय महिला ग्राहक सहकारी संस्था मर्यादित नाशिक, दारणा-काठ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे पळसे.

वरील संस्थेच्या मतदार याद्या संबंधित संस्थेचे कार्यालय व उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, तालुका नाशिक यांच्या कार्यालयात पहावयास मिळतील, याद्यांवरील हरकती उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांच्या कार्यालयीन वेळेस स्वीकारल्या जातील, असे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com