नाशिक । प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीत पाचशेहुन अधिक युवक काॅग्रेसचे पदाधिकार्यांनी विजयाचा गुलाल उधळला अाहे. युवक काॅग्रेसकडून यासर्व नवनियुक्त सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्यांना ग्रामपंचायत कामकाजाची माहिती दिली जाईल...

अवघ्या राज्याचे लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. निकालात काॅग्रेसने घवघवीत यश मिळवले असून जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात युवक काॅग्रेसचे तरुण रक्त असलेले पदाधिकारी मोठया प्रमाणात सदस्य म्हणून निवडून आले असून ही संख्या पाचशेपेक्षा जास्त आहे.

तरुण तुर्कांच्या ताकदीवर आगामी काळात पक्षाला 'अच्छे दिन' आणण्यासाठी युवक काॅग्रेस प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काॅग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे निवडूण आलेल्या नविन सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणार आहेत.

ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून कोणती विधायक कामे करता येईल, त्यांची जबाबदारी, अधिकार व कामाची पध्दत याबाबत या नविन सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी तयार करण्याचे काम पक्षाकडून केले जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात युवक काॅग्रेसचे पाचशेहून अधिक पदाधिकारी विजयी झालेत. त्यांना ग्रामपंचायतीचे कामकाज व जबाबदारी यांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल.
सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष, युवक काॅग्रेस