पेठनामा: विकास कामांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

पेठनामा: विकास कामांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

पेठ | सुनील धोंडगे | Peth

आगामी निवडणूकांमध्ये (election) राष्ट्रवादी पक्षाला निर्विवाद वर्चस्व मिळवुन देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी (Assembly Vice President Narhari Jirwal) कंबर कसली असुन सत्तेत असल्याने व अत्यंत महत्त्वाचे पद ताब्यात असल्याने विकास कामांसाठी (development works) निधी (fund) प्राप्त करुन घेण्याचे हुकुमाचे पान हाती असल्याने

राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे इतर पक्षाची स्थिती अत्यंत गलीतगात्र झालेली असतानाच तालुकास्तरावर आलेली मरगळ झटकुन पक्ष अस्तित्वासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या पंखात बळ आणणेसाठी कुणीही जिल्हास्तरावरील, राज्य स्तरावरील मातब्बर प्रतिनिधी प्रयत्न करतांना दिसुन येत नसल्याने स्थानिक ठिकाणी अस्तित्वासाठी काय करावे असा समर प्रसंग निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीने झंझावात निर्माण केलेला असतांना केंद्रात मंत्रीपद भुषविणार्‍या खासदार डॉ. भारती पवार (MP Dr. Bharti Pawar) यांनी आपल्या पक्षाची मजबुतीसाठी किंवा पक्षवाढीसाठी विशेष परिश्रम घेत असल्याचे दिसत नाही. राज्यात आघाडी सरकार कार्यरत असतांना स्थानिक पातळीवर मात्र एकोप्याचे किंवा सर्व समावेशक चित्र दिसत नाही. सर्वच पक्ष पदाधिकारी स्वपक्षीय हितासाठी व पर्यायाने स्वताःचे अस्तित्वासाठी पक्षीय शक्तीचा वापर करण्याचे तंत्र जोपासत आहे. नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापीत केले पासुन विधानसभा नरहरी झिरवाळ यांनी पुरातन गाव तलाव व शहरातील भूमीगत गटारी (Underground sewers), जोडरस्ते, मंगल कार्यालये आदीसाठी 16 कोटी 67 लाख रुपयांचे कामास मंजूरी मिळवली.

तहसिल कार्यालय (Tehsil Office), पोलीस ठाणे (Police Thane) नविन वास्तूत स्थलांतरीत झाल्याने तसेच कर्मचारी वसाहत ओस पडलेली असल्याने तसेच वादग्रस्त शॉपींग कॉम्प्लेक्स (Controversial shopping complex) या इमारती हस्तातरण करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याने पेठ नगरपंचायत (peth nagar panchayat) अल्पावधीतच कात टाकणे बरोबरच अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे शक्य असल्याचे दिसुन येते.

या झंझावातामुळे विरोधक सेनेची कोंडी करण्याची व्युहनिती दिसत असली तरीही आहे. त्या आयुधानिशी संघर्ष करतांना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांना साकडे घालून त्यांचे माध्यमातून तिर्थक्षेत्र योजनेतून कोपूर्ली, हट्टी (शिंदे), मोहाचापाडा, शिंदे या गावांसाठी 10 कोटीच्या कामांसाठी प्रस्तावीत करतांना आपणही काही कमी नाही असा पावित्रा घेतल्यांने एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी का होईना तालुक्याच्या विकासासाठी व अस्तित्वासाठी असा संघर्ष आवश्यकच आहे.

समाधानकारक पाऊस पडुनही पाणी साठवणूकीचे नियोजन नसल्याने तीव्र उताराने पाणी पश्चीमेकडे वाहून जाते. गुजरातला (gujrat) पाण्याचा थेंबही जाऊ देणार नसल्याच्या पोकळ धमक्या सर्वच पक्ष देत असतांना डोळ्या देखत गेली कित्येक वर्षांपासून सुरगाणा, दिंडोरी, पेठच्या हद्दीतून जवळपास पावसाळ्यात व त्या नंतर महिनाभर नाली, ओहोळ, दर्‍यांमधून बिनादिक्कत वाहून जात आहे. मात्र यावेळी साठवण बंधारे, गेटेड बंधारे आदीच्या माध्यमातून 669 . 01 द . ल . घ . मि . पाणी साठवणुकीसाठी 30 गावांची निवड करण्यात आली आहे.

शासन दरबारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सिंचन क्षेत्रासाठी प्रयत्नशिल असुन किमान तालुक्याच्या विकासासाठी व बळीराजाच्या उत्कर्षासाठी राजकीय कुरघोडीचे राजकारण न करता त्या कामाना मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे. या गदारोळात पिण्याचे पाणी साठीच्या नळ पाणी योजनेच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असुन अत्यंत जिव्हाळ्याचा या प्रश्नच्या मुळाशी जाणे अत्यत आवश्यक आहे.

अनेक गावांना उदभव विहीरी पासुन नळपाणी योजना मंजूर करण्यात येऊन दिर्घकाळ लोटूनही काही अपूर्ण तर काही कागदावरच असताना अनेक पाणी साठवणुक करणार्‍या टाक्या सदोष असल्याने नळपाणी योजनेसाठी शासन स्तरावरुण योजना दिलेल्या गावे व वाड्यापाड्याना टँकरद्वारे पाणी देता येत नसल्याने त्या टंचाईग्रस्त कृती आराखड्यात समाविष्ठ करण्यात येत नसल्याने अश्या गावे,

वाड्या पाड्यांवरील नागरीकाना पाण्यासाठी मैलोगणती परिश्रम करणे अपरिहार्य आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याचे उपलब्धतेसाठी शासकीय निधीची व मंजूरीची वाट न पाहता स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल नेटवर्कींग फोरम या सामाजिक संस्थेने अनेक गावांना वाडे वस्त्यांतील तृषार्थ नागरीकांच्या मुलभुत गरजा पूर्ण करणेसाठीचा स्तृत्य उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com