'एनडीएसटी’ पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील शिक्षकांची (Teachers) सर्वात मोठी पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिक डिस्ट्रीक्ट सेकंडरी टिचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचिंग एम्लॉई सोसायटी (Nashik District Secondary Teachers and Non Teaching Employees Society) अर्थात ‘एनडीएसटी’ (NDST) पतसंस्थेची निवडणूक (Election) प्रक्रिया सुरु झाली आहे....

येत्या 30 एप्रिलपर्यंत मतदार यादी सहकार विभागाने मागवली असून, त्याआधारे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपलेली आहे. मात्र, करोना (Corona) काळात निवडणुका घेणे शक्य नसल्यामुले त्यांना दोन वर्षांचा वाढीव कार्यकाळ मिळाला आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शासकीय व खासगी आश्रम शाळेतील शिक्षक, शासकीय आयटीआय व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत.

जिल्ह्यात साधारणत: 11 हजार सभासद असलेली एकमेव संस्था म्हणून ‘एनडीएसटी’ (NDST) सोसायटीचा नावलौकिक आहे. या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने घोषित केला आहे.

त्यानुसार पात्र सभासदांची यादी येत्या 30 एप्रिलपर्यंत अंतिम होणार आहे. प्रारुप यादीवर हरकती मागवल्या जातील. या हरकती निकाली निघाल्यानंतर अंतिम मतदार यादी घोषित केली जाईल. साधारणत: 31 जुलै 2022 पूर्वी नवीन संचालक मंडळाची निवड व्हायला हवी, असे सहकार विभागाचे (Co-operative Department) आदेश आहेत.

तीन पॅनलची शक्यता

‘एनडीएसटी’ सोसायटीच्या निवडणुकीत (NDST Society Election) यंदा तीन पॅनल उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर यांचा स्वतंत्र पॅनल तयार होईल. तर माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या माध्यमातून आर. डी. निकम हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

या दोन्ही पॅनल सोबतच आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) रुपाने नवीन प्रयोग करण्याचा मानस के. के. अहिरे, साहेबराव कुटे यांसह समविचारी शिक्षक करत आहेत. त्यामुळे यंदा एनडीएसटी सोसायटीच्या निवडणुकीत अधिक रंगत येणार असल्याचे दिसते. त्यादृष्टीने भावी उमेदवारांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत

सभासदांची कर्जमर्यादा 5 लाखावरुन 15 लाख केली. तसेच व्याजदर 9.5 टक्क्यांवरुन अवघे 7 टक्क्यांवर आणला. सभासदांना 25 लाखाचा अपघाती विमा संरक्षण दिले.विशेष म्हणजे सभासदांच्या मुलीच्या विवाहात 11 हजार रुपयांचे कन्यादान ‘एनडीएसटी’ने दिले. डिजिटल सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

- मोहन चकोर, माजी अध्यक्ष, एनडीएसटी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com